Press "Enter" to skip to content

मुद्रा बँक कर्ज योजना रू. १० लाख पर्यंत कर्ज.

Ganesh Jadhav 0

मुद्रा बँक कर्ज योजना रू. १० लाख पर्यंत कर्ज.

देशातील लघु उद्योगांना सहज कर्ज पुरवठा व्हावा, या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ एप्रिल २०१५ रोजी २०,००० करोड रुपये भांडवल असलेली ‘मायक्रो युनिट्स डेव्हलपमेंट अँड रिफायनान्स एजन्सी’ अर्थात मुद्रा बँकेचे उद्घाटन केले.

या बँकेतून लघु उद्योजकांना 10 लाखांपर्यंतचं कर्ज सहज उपलब्ध होणार आहे. यासाठी सरकारने एकूण 20 हजार कोटींची तरतूद केली आहे. या बँकेच्या मध्यमातून लघु उद्योगांना कर्ज देण्यासाठी देशातील इतर बँकांना प्रोत्साहनही देण्यात येईल. शिवाय या कर्ज योजनांच्या नियमनाचं कामही मुद्रा बँकेच्या हाती असेल.

मुद्रा योजनेतील कर्जाचे प्रकार

मुद्रा योजनेत खालील तीन श्रेणीचा समावेश आहे:

 1. शिशू : शिशू श्रेणीअंतर्गत 50,000 रुपयांचं कर्ज मिळू शकतं
 2. किशोर : किशोर श्रेणीत 50,000 रुपयांपासून 5 लाख रुपयांपर्यंत कर्ज दिलं जाते
 3. तरुण श्रेणी : तरुण श्रेणीअंतर्गंत 5 लाख रुपयांपासून 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळेल

थोडक्यात मुद्रा बँक योजना

मुद्रा बँकेद्वारे छोट्या कारखानदारांना आणि दुकानदारांना कर्ज मिळेल. ज्यांना नवा उद्योग, काम सुरु करायचे असेल, त्यांनाही कर्ज मिळेल. त्याच बरोबर भाजीवाले, सलून, फेरीवाले, चहाचे दुकानदार यांनाही लोन दिले जाईल.

पंतप्रधान मुद्रा योजनेत प्रत्येक सेक्टर नुसार स्कीम बनवली जाते. प्रत्येक सेक्टर मध्ये वेगवेगळ्या स्कीम असतील. मुद्रा बँक हि रिझव्‍‌र्ह बँकेच्या नियंत्रणाखाली ती काम करते. मुद्रा ही संस्था मुख्यत: लघु उद्योगांनाच अर्थ पुरवठा करते. व्याजाचा दर कमी आहे.. कर्ज मंजूर झाले की त्यानंतर कर्जदाराला “मुद्रा कार्ड” दिले जाते जे की क्रेडीट कार्ड सारखे असेल आणि जेवढे कर्ज मंजूर झाले आहे तसे वापरता येईल.

मुद्रा योजनेची वैशिष्टय़े

 • देशातील ५.७७ कोटी उद्योजकांना वित्तसाहाय्य
 • वार्षिक ७ टक्के दराने १० लाख रुपयांपर्यंत अर्थपुरवठा
 • २०,००० कोटींचे भक्कम सरकारचे भांडवली पाठबळ
 • सिडबीची ही उपकंपनी रिझव्‍‌र्ह बँकेच्या अखत्यारीत येणार
 • सूक्ष्म वित्त संस्थेव्यतिरिक्त बँकेकरिता स्वतंत्र विधेयक

 

मुद्रा लोन साठी आवश्यक बाबी

 • कोणत्याही प्रकारचा जामीन नाही.
 • कोणत्याही प्रकारचे मोर्गेज ठेवावे नाही
 • स्वतःचे 10 टक्के भाग भांडवलची गरज नाही.
 • हि योजना फक्त सरकारी बँकेतच होणार.
 • वय 18 वर्षे पूर्ण असले पाहिजेत
 • अर्जदार कोणत्याही बँकेचा थकबाकीदार नसावा.

 

मुद्रा बँकेतून कर्ज घेण्यासाठी लागणारी कागदपत्रे

 1. ओळखीचा पुरावा – मतदान ओळख पत्र, आधार कार्ड इ.
 2. रहिवासी पुरावा उदा – लाईट बिल, घर पावती.
 3. आपण जो व्यवसाय करणार आहोत किंवा करत आहोत त्याचा परवाना व स्थायी पत्ता.
 4. व्यवसायासाठी लागणारे मटेरियल किंवा यंत्र सामुग्री इ. त्याचे कोटेशन व बिले.
 5. आपण ज्या व्यापाऱ्याकडून माल घेतला त्याचे पुर्ण नाव व पत्ता.
 6. अर्जदाराचे 2 फोटो.

तुमच्या व्यवसायाची वेबसाईट बनवा फक्त 5000/- रुपयात. आम्ही बनवून देतोय तुमच्या व्यवसायाची वेबसाईट फक्त रुपये 5000/- मध्ये. 5 पानांची वेबसाइट . आधिक माहितीसाठी आत्ताच संपर्क करा   8879458104     http://www.sgsolutions.co.in

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *